About Us

आमच्याबद्दल...

तर, मंडळी…!
हाय, हॅलो, नमस्कार…!
तू सध्या काय करतेस, कुठं आहेस…? असा प्रश्न अनेक जण मला विचारातायेत. त्यावर माझं सांगणं असतं, हे काय आहे की इथंच ‘आसपास’…!
हो, मी तुमच्या ‘आसपास’च आहे असणार आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या मुख्य प्रवाहात अनेक वर्ष काम केल्यानंतर मी आता ‘डिजिटल’ माध्यमासोबत आपल्या ‘आसपास’चा प्रवास सुरू करतीये.
मुख्य प्रवाहात काम करताना आता इथचं स्थिर व्हावं, असं वाटत असतानाच परत एकदा नव्या वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला. तुमच्या ‘आसपास’ राहूनच थोड्या वेगळ्या वाटेनं जाऊन ‘आसपास’च्या घटना तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. कोणत्याही घटनेला एक किंवा दुसरी एवढीच बाजू नसते, तर अनेक बाजू असतात, पण त्याच सुटून जातात. याच सुटून जाणाऱ्या बाजू समोर आणण्यासाठी माझी धडपड असणार आहे.
केवळ राजकारणातल्याच घटना नाहीत, तर कला, क्रीडा, साहित्य, मनोरंजन, विज्ञान – तंत्रज्ञान, शिक्षण, आणि गुन्हेगारी क्षेत्राच्या ‘आसपास’ नेमकं काय घडतय हे सांगत असताना नवं नव्या लोकांससोबत गप्पाही मारणार आहे.
कोणतीही घटना दुराग्रहीपणे न मांडता थेट आणि स्पष्टपणे समोर मांडण्यासाठी मी हा प्रवास मोठ्या धाडसाने सुरु करतीये. मला खात्री आहे या प्रवासात तुम्ही सर्वजण माझ्या ‘आसपास’ असणार आहात. तर मग आता भेटत राहू ‘आसपास’ या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर…!