जळगाव: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. जळगावचे माजी पालकमंत्री आणि शरद पवार गटाचे महत्त्वाचे नेते गुलाबराव देवकर लवकरच अजित पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुलाबराव देवकर यांनी नुकतीच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते शरद पवार गट सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
महायुती सरकारचे अधिवेशन सुरू:
महायुती सरकारने सत्ता स्थापनेनंतर विधानसभेचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांनी नुकतेच शपथ घेतली. विरोधी पक्षांचा आवाज कमी झाल्याने महायुतीचे पारडे विधानसभेत जड आहे.
गुलाबराव देवकर यांचा निर्णय शरद पवार गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, उत्तर महाराष्ट्रात अजित पवार गटाची ताकद वाढण्याची चिन्हे दिसत आहे






